International Journal of Leading Research Publication

E-ISSN: 2582-8010     Impact Factor: 9.56

A Widely Indexed Open Access Peer Reviewed Multidisciplinary Monthly Scholarly International Journal

Call for Paper Volume 7 Issue 1 January 2026 Submit your research before last 3 days of to publish your research paper in the issue of January.

स्वातंत्र्य पूर्व कालखंडातील शेतकरी जीवनाविषयी मराठी काव्य

Author(s) बलराम गणपत कांबळे
Country India
Abstract आधुनिक मानवी जीवनात अनेक स्थित्यंतरे झाली जीवन विषयक जाणीव बदलल्या आधुनिकता यंत्र युग विज्ञान तंत्रज्ञानातून निर्माण झालेल्या अमान्य महत्वकांक्षांमुळे मूलभूत मानवी प्रेरणा आणि जगण्याच्या शैलीमध्ये अमुलाग्र बदल झाले असे झाले तरी मानवी जीवनातील काव्याचे महत्त्व कमी झाले नाही. मात्र या सर्वांचा परिणाम कवितेच्या रूप अविष्कारावर झाल्याचे दिसते . याही पुढे जाऊन आपण काव्याबाबत विचार केला तर कविता म्हणजे पुढील व्याख्यानेअधिक चांगले स्पष्ट होईल "विशिष्ट लयीत म्हटलेले शब्द म्हणजे कविता होय"१ पण केवळ अक्षरांचे दृश्य रूप व नादरूप म्हणजे कविता नसते कारण असे मानले तर शब्दातील नादरूप किंवा दृश्यरुप महत्त्वाचे ठरतील आणि इतर घटक गौणठरतील म्हणून "वाचकाला आणि आस्वादकाला येणारे एक विशिष्ट अनुभव म्हणजे कविता "२असते आपल्याला म्हणता येईल. कविता ही मानवी जीवनावर परिणाम करते परंतु हा परिणाम केवळ आनंदाचा नसेल तर जीवनविषयक जाणवेमध्ये भर टाकणारा असतो कविता मनाला जागृत करते जगण्याची उम्मेद देते आणि खोल समज देते ती माणसाच्या अस्तित्वाचा नात्यांचा आणि मानवी संबंधाचा अर्थ उघडते म्हणूनच "माणसांच्या अंतर्मनाला घातलेली साध म्हणजे कविता होय" ३ चांगली कविता मानवी जीवन समृद्ध करते हा विश्वासच तिच्या असतील प्रतिक होण्यास भाग पाडतो म्हणून एकूण चिंतनात्मक किंवा कृषी विषयक कवितांमध्ये मानवी मनाचा वेध घेऊन शेतकऱ्यांच्या कष्टाचे शोषणाचे दारिद्र्याचे चित्रण स्वातंत्र्यपूर्व कवितेत पाहावयास मिळते. शेतकऱ्याचे दैनंदिन जीवन वर्णन करणाऱ्या कविता : ज्या कवितेत साधारण पणे शेतीमाती खेडे त्या ठिकाणचे जनजीव नाचे चित्रण संवेदनाशील ते नाही केलेल्या असते तिला साधारणपणे शेतीविषयक काव्यवस्थापन म्हणू शकतो खेड्यातील जनजीवनाचे दुःख हर्ष दारिद्र्य रूढी परंपरा संस्कृती या साऱ्यांचा समावेश या काव्यात होतो मराठी शेती विषयक काव्याची सुरुवात आमचे एका कवी पासून किंवा कवितेपासून झाले असे निश्चितपणे ठरवता येत नाही अगदी मराठी काव्याच्या प्रारंभ पासून शेती विषयक कवितेचा खुणा मराठी कवितेमध्ये कमी अधिक प्रमाणात दिसून येतात खेड्याचे जीवन चित्रण करण्याचे प्रेरणा केशवसुतांच्या काळापासून अनेक कवींच्या मनात कमी अधिक प्रमाणात निर्माण झालेली दिसून येते यामध्ये कवी विठ्ठल भगवंत लेंभे ,मोरा गणेश लोंढे यांनी शेतकरी व कृषी जीवनावर अनुक्रमे शेतकरी आणि हंगाम या कविता लिहिलेले आहेत श्री लंबे यांच्या शेतकरी या काव्यात याजामुळे कर्ज वाढत जाऊन आपली गुरे शेती सर्व काही सावकाराला देण्याची वेळ शेतकऱ्यावर येते तो शेतकरी आपली पूर्वीचे कृषी सौख्य दुःखद स्मरतो आणि आपल्या शेतीला निरोप देताना शेतकरी म्हणतो.
Keywords -
Published In Volume 6, Issue 2, February 2025
Published On 2025-02-06

Share this